बारामती दि.१५: बहुजन समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी पदी काळुराम चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईतील बीएसपी भवन येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चौधरी यांची हि निवड करण्यात आली आहे.

या बैठकी मध्ये बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा.अशोक सिद्धार्थ,महाराष्ट्र प्रभारी नितीन सिंह,प्रमोद रैना,प्रदेशाध्यक्ष संदीप तांजने,प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार,प्रदेश प्रभारी प्रशांत इंगळे,सुनील डोंगरे व प्रदेश कार्यकारिणीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

गेल्या वीस बावीस वर्षांपासून आपण बहुजन समाज पक्षाचे काम करत असून वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कुठे हि तडा जाऊ न देता.येत्या काळात पश्चिम महाराष्ट्रात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान,काळुराम चौधरी आपल्या आक्रमक आणि खुमासदार भाषणाने सर्वत्र परिचित असून येत्या काळात चौधरी यांच्या नेतृत्वात पश्चिम महाराष्ट्रात बहुजन समाज पक्ष अधिक चांगली कामगिरी करेल असा विश्वास बसप कार्यकर्त्यांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed