प्रतिनिधी – संकल्प ऑर्गनायझेशन यांच्या वतीने शनिवार आणि रविवार दिनांक 17 व 18 सप्टेंबर रोजी बारामती मध्ये शॉपिंग & फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक सरिता मुथा, योगिता पाटील व स्मिता शहा यांच्या वतीने देण्यात आली आहे. सदर शॉपिंग & फूड फेस्टिवल मध्ये पुणे,मुंबई,वापी सुरत व भुसावळ येथील आकर्षक स्टॉल उपस्थित असणार आहेत.
बारामतीकरांसाठी दसरा आणि दिवाळी डोळ्यासमोर ठेवून विविध नामांकित स्टॉलची आणि खरेदीची पर्वणीच असणार आहे. हा शॉपिंग व फूड फेस्टिवल महावीर भवन तिन हत्ती चौक बारामती या ठिकाणी शनिवार 17 व रविवार 18 सप्टेंबर २०२२ रोजी स. १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
यासाठी मुख्य प्रायोजक म्हणून गांधी ज्वेलर्स तर दिया सिल्क व सुप्रीम फर्निचर सह प्रायोजक म्हणून लाभले आहेत.
याच कार्यक्रमात महिलांसाठी नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली यामध्ये मम्मा अँड किड्स कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशन आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन हे या शॉपिंग व फूड फेस्टिवलचे आकर्षण केंद्र ठरणार आहेत.