एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प बारामती यांनी गौरीच्या देखव्यामधून अंगणवाडी व पोषण माह माहिती दिली

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे) एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प बारामती – १ मधील बिट पणदरे – २ अंतर्गत अंगणवाडी केंद्र अंबिकानगर मध्ये कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका सौ. निलम दिगांबर मुळीक यांनी गौरीच्या देखव्यामधून अंगणवाडी व पोषण माह सप्टेंबर २०२२ याची माहिती उपस्थित महिलांना दिली . यामध्ये अंगणवाडी सेविका , मदतनीस , पोषण गुढी , ग्रामबालविकास केंद्र , बाळकृष्ण कोपरा , विविध फळे , फळभाज्या व पालेभाज्या तसेच कडधान्य यांच्या साहाय्याने गौरीची सजावट केली . आपल्या सर्वांच्या आहारामध्ये वरील सर्व बाबींना अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन ही सजावट केल्याची सौ. निलम मुळीक यांनी माहिती वर्तवली. तसेच या देखाव्यात जनजागृती होईल असे विविध पोस्टर्स , रांगोळी नि बॅनर यांचाही समावेश करण्यात आला होता . आपल्या संस्कृतीप्रमाणे हळदीकुंकूसाठी येणाऱ्या सर्व महिलांनी या आगळ्यावेगळ्या सजावटीचे भरभरुन कौतुक केले.
यासाठी बालविकास श्री. अभिमान माने साहेब , बीट पर्यवेक्षिका श्रीमती नीता फरांदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या देखाव्याची दखल जिल्हा परिषद पुणे , आयुक्त कार्यालय नवी मुंबई यांच्याकडून घेण्यात आली . श्री. गिरासे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( म. बा. क. ) जिल्हा परिषद पुणे यांनी अंगणवाडी सेविका सौ. निलम दिगांबर मुळीक यांचे भरभरून कौतुक नि अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *