अनंत काळाचे साठलेलं दुःख
आपुलकीच्या खांद्यावर
मोकळे होताच
पाणावलेल्या नयनातून अश्रूचे ओघळ
वाहतात आनंदाने सम्यक मैत्रीच्या रानावनात….

विश्वासाच्या मजबुत साकवावर
मार्गक्रमण करताना
मनाला ठामपणे सांगावेच लागेल
की
संशयाची जळमटं आजूबाजूला
धरूच नयेत कधीच
अगदी अखेरच्या श्वासापर्यंत…..

सत्य उमजून विचाराने पेटलेल्या माणसांना
काट्या कुट्यातून, मान अपमानातून,
विरोध प्रत्यारोपतून
सम्यक मार्गावर चालताना
त्रास कधीच होत नाही पायांना
त्यांना माहीत असत
सत्याच्या वाटेवर गैरसमजुतीचा अंधार
टिकतच नाही कधीच फार काळ…..

सम्यक विचारानं मनावर केलेला कब्जा
मात्र सोडायचा नाही कधीच
जीवात जीव असेपर्यंत
सत्याच्या सोबतीने मायभूमीवर
मानवता ,समता ,बंधुता, करुणा
अखंड जिवंत ठेवायची ये
माणसाने माणूस म्हणून…..

आयु. एस टी धम्मदीक्षित.
काळामवाडी कोल्हापूर
९६११२५३४४१.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *