प्रतिनिधी – बारामती निर्भया पथकाने डीवायएसपी श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसर, सीसी कॉर्नर, अभिमन्यू कॉर्नर, संदीप कॉर्नर, विद्या प्रतिष्ठान मेन गेट समोर तसेच पेन्सिल चौक या ठिकाणी पेट्रोलिंग करून बेशिस्त वाहन चालवणाऱ्या मुलांवर त्यामध्ये ट्रिपल सीट, विदाऊट लायसन, लायसन जवळ न बाळगणे, मोबाईल संभाषण, अशा एकूण 27 केसेस करून एकूण 35,000 रुपये दंड वसूल केला. महाविद्यालय परिसरामध्ये मुले मोठ्या प्रमाणावर ट्रिपल सीट, कट मारणे, मोबाईल फोनवर बोलत गाडी चालवणे, लायसन जवळ न बाळगणे, लायसन नसणे अशा प्रकारे बेशिस्त पणे गाड्या चालवत असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यापुढे वेळोवेळी निर्भया पथकामार्फत अशा मोटरसायकल स्वरांवरती नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच बेशिस्तपणे वर्तन करणाऱ्या आठ मुलांवर कारवाई करण्यात आलेली आहे. अशी माहिती निर्भया पथकाच्या अमृता भोईटे यांनी दिली आहे.