माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे) बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने दरवर्षी आदर्श पुरस्कारांचे वितरण ५ सप्टेंबर ‘ शिक्षक दिनानिमित्त’केले जाते चालू वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण सोमवार दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रवादी भवन कसबा- बारामती येथे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्या अध्यक्षतेखाली व बारामती तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संपतराव गावडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची वेळ दु.3:00 वा.असून संबंधित शाळांचे संस्थापक ,प्राचार्य, मुख्याध्यापक शिक्षक व पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिक्षक सेल च्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्याध्यापक गटात ३ शिक्षक गटात ७ व शिक्षकेतरांमधून २ एकूण १२ व्यक्तींना सदर कार्यक्रमात गौरविण्यात येणार असल्याची माहिती बारामती शहर राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष श्री अविनाश सावंत सर व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिक्षक सेलचे अध्यक्ष श्री नागनाथ ठेंगल यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed