प्रतिनिधी – दि. 2 उज्वल आरोग्य सेवाभावी प्रतिष्ठान जळगाव सुपे व बुधराणी हॉस्पिटल पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवा निमित्त जळगाव सुपे या ठिकाणी मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी उज्ज्वल आरोग्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगन्नाथ जगताप व तंटामुक्ती समिती अध्यक्ष शशिकांत खोमणे यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. तसेच बुधराणी हॉस्पिटलचे वैभव गावडे व आपासाहेब काळे यांनी शिबिरातील लोकांची तपासणी केली. यावेळी 55 लोकांनी डोळ्याची तपासणी केली. त्याचप्रमाणे 22 लोकांना मोफत ऑपरेशन साठी पुणे येथे पाठवण्यात येणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश खोमणे, नेहरू युवा केंद्र तालुका प्रतिनिधी वैभव भापकर, ज्येष्ठ नागरिक पोपट जगताप, प्रदीप खोमणे, दिगंबर जगताप,अनिल जगताप, गणेश पाटोळे, नंदकुमार जाधव तसेच या कार्यक्रमाला ग्रामस्थ महिलावर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed