प्रतिनिधी – जळगाव सुपे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी श्री. शशिकांत शिवाजी खोमणे यांची बिनविरोध निवड झाली आहे, 15 ऑगस्ट निमित्त च्या ग्रामसभे मध्ये दिनांक 29 /8 /2022 रोजी विठ्ठल मंदिरात ग्रामसभा पार पडली. एकूण 9 जण अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते परंतु प्रामुख्याने श्री. संदीप रमेश खंडाळे व श्री तानाजी खोमणे (संचालक, दूध संघ बारामती) यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन श्री शशिकांत शिवाजी खोमणे यांची बिनविरोध निवड केली, ग्रामसभेस सरपंच श्रीमती. कौशल्या खोमणे, ग्रामसेवक, श्री. गणेश लडकत, श्री. अनिल जगताप,(मा.चेअरमन दूध संघ बारामती) कु. अमोल जगताप, श्री. लक्ष्मण जगताप (संचालक, खरेदी विक्री संघ, बारामती) श्री. निलेश खोमणे (अध्यक्ष, उमाजी नाईक प्रतिष्ठान) व ग्रामस्थ हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed