माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे) – सध्या उद्योजक, शेतकरी, सामान्य ग्राहक हे कोरोणा मुळे आर्थिक अडचणित सापडले आहेत. महागाई, बेरोजगारी आल्यामुळे गेले दीड वर्ष ग्राहक (विद्युत) वीज बिल भरू शकले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यवसायिकांनी सीसीआरएफ फंडातून स्वतःच्या खर्चातून विद्युत कनेक्शन घेण्यासाठी (सुरक्षित अनामत) येणारा खर्च, मजुरी, पोल, तार, इत्यादी खर्च करून उद्योग व्यवसाय उभे केले. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीला फायदा होऊ लागला. आधी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही खर्च करा येणारा खर्च आम्ही तुम्हाला सी सी आर एफ फंडातून येणाऱ्या वीज बिलातून वजा करून देऊ असं सांगितलं होतं. परंतु आता योजनाच बंद झाली आहे असे ते सांगतात. स्टॅम्प पेपर वरती तसा करार करून दिला आहे. येणार खर्च, त्याचं कोटेशन ही अधिकाऱ्यांनी मंजूर करून दिल आहे. ही योजना आता दोन वर्षांपूर्वी बंद झाली आहे. परंतु मागील वर्षी ज्यांनी या योजनेतून विद्युत कनेक्शन स्वतःच्या खर्चातून घेतलं त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. परंतु त्यांना अजून देखील तो खर्च मिळत नाही. येणाऱ्या विद्युत बिलातून तो खर्च वजा न करता लाईट बिलासाठी तकादा लावणाऱ्या अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कारण फक्त वीजबिलासाठी अधिकारी प्रयत्न करतात, परंतु ग्राहकांनी विद्युत वितरण कंपनी वर विश्वास ठेवून स्वतःच्या खर्चातून विद्युत कनेक्शन घेण्यासाठी डेपो पोल तार व मजुरी दिली असताना देखील त्यांना त्या योजनेचा लाभ दिला जात नाही. गेले पाच वर्ष झालं शेतकरी, उद्योजक, ग्राहक पाठपुरावा करून देखील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात अशा परिस्थितीमध्ये बारामती ग्रामीणचे कार्यक्षम व लोकप्रिय अधिकारी मा श्री धनंजय गावडे उप अभियंता बारामती ग्रामीण यांना उद्योजक सुनील देवकाते यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वसामान्य लोकांना आपण न्याय द्यावा ही विनंती केली व गांधीगिरी मार्गाने आपले मत त्यांच्या पर्यंत पोहचवल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना देवकाते यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *