माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे) कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था काऱ्हाटी च्या न्यू इंग्लिश स्कूल ढाकाळे या विभागामध्ये काल दिनांक ३०/०८/२०२२ रोजी महिला कर्मचारी व विद्यार्थिनी यांची सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रास adv सौ. स्नेहा भापकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी त्यांनी posco कायद्याबद्दल संपूर्ण माहिती देऊन त्याचा उपयोग कसा करावा, तसेच वेळीच जागरूकता दाखवली तर भविष्यात घडणाऱ्या मोठ्या घटना आपण टाळू शकतो ,असे आवर्जून नमूद केले यासाठी कायदेविषयक आपण जागरूक असले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बारामती निर्भया पथकाच्या अधिकारी अमृता भोईटे यांनी देखील निर्भया पथकाचा उद्देशच विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटावे यासाठी आहे त्यावेळी त्यांनी हेल्पलाइन 112, 1098 याविषयी देखील सखोल मार्गदर्शन केले . यावेळी त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते. सौ सुप्रिया आहेरकर यांनी देखील विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवून त्या दृष्टीने वाटचाल करावे असे नमूद केले यावेळी संस्थेतील महिला कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री. गिरीश कुंभार यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एजगर सर यांनी केले