माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) पाहुणेवाडी ग्रामपंचायत आज झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष विषयी ग्रामसेवक अवनतिका काळे यांनी विषय घेतल्या नंतर जयराम तावरे यांची ग्रामसभेत सर्वं ग्रामस्थांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली .
त्यावेळी पाहुणेवाडी ग्रामपंचायत चे सरपंच भगवान तावरे ,उपसरपंच राधिका भंडलकर, पोलिस पाटील सुरेश काटे , ग्रामसेविका अवंतीका काळे, माजी सरपंच शशिकांत तावरे , दत्तात्रेय खुडे , शशिकांत चव्हाण,उमेश परकाळे, कल्याण कदम, राजेंद्र ताकवले , सचिन यादव ,प्रमोद सापते, शुभम तावरे, संदीप इंगळे, रणजित तावरे , विशाल शिंदे, अजित कदम , सुनिल खुडे , उत्तम ढवळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते . तसेच राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर धनवान वदक धनराज निंबाळकर अक्षय परकाळे यांनी तंटामुक्ती अध्यक्ष जयराम तावरे यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष पदी जयराम तावरे यांची निवड होताच गावातील वाद विवाद हे गावातच सोडवण्यासाठी प्रयत्न करू तसेच गावातील कोणतीही शांतता भंग होणार नाही यासाठी सदैव तत्पर राहु असे आश्वासन नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष जयराम तावरे यांनी दिले . यावेळी सर्व ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed