बारामती मधील आयर्न मॅन खेळाडूंचा टेक्निकल विद्यालायकडून सत्कार
प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बारामतीचे प्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डॉ. पांडुरंग गावडे होते.तसेच नुकतेच बारामतीच्या तरुण खेळाडूंनी आयर्न मॅन चा किताब मिळवला आहे त्यांचा सत्कार विद्यालयामार्फत करण्यात आला. यामध्ये मयूर आटोळे,ओम सावळे पाटील,दिग्विजय सावंत,राजेंद्र ढवरे, विपुल पाटील,अवधूत शिंदे यांचा सत्कार विद्यालायमार्फत करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.या वेळी डॉ.पांडुरंग गावडे, विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,सर्व यशस्वी खेळाडू,जेष्ठ शिक्षक श्री मोहन ओमासे,श्री आनंदराव करे, श्री सुधीर जाधव,शशिकांत फडतरे,सुनील चांदगुडे,महादेव शेलार जयश्री हिवरकर, अर्चना पेटकर,क्रीडाशिक्षक श्री सुदाम गायकवाड उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडाशिक्षक श्री सुदाम गायकवाड यांनी प्रस्ताविकेतून क्रीडादिनाचे महत्व विषद करत विद्यालयाची क्रीडा क्षेत्रांतील प्रगती स्पष्ट केली.तसेच पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने विद्यालयाच्या जिम साठी 7 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पांडुरंग गावडे यांनी आरोग्य व क्रीडा यांचे महत्व सांगितले.तसेच त्यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी मिळवलेल्या यशासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शरीर सुदृढ राहायला हवे यासाठी त्यांनी ही स्पर्धा पूर्ण करून बारामतीच्या युवकापुढे एक आदर्श घालून दिला आहे. तसेच या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ऊर्मिला भोसले यांनी तर आभार अर्जुन होलमुखे यांनी मानले.