प्रतिनिधी – बारामती गणेश फेस्टीव्हलचे उदघाटन गुरुवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रा पवार या उपस्थीत राहणार आहेत. अशी माहिती फेस्टीव्हलचे संयोजक किरण गुजर यांनी दिली. ३ या वर्षाचा गणेशत्सोव दिनांक ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये होणार आहे. दिनांक ३१ रोजी सकाळी १० वाजता श्री गणेशाची प्रतिष्ठापना उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांचे हस्ते होणार असून सायंकाळी महिलांच्या भजनाचा कार्यक्रम आहे. दिनांक १ रोजी उदघाटनानंतर चित्रपट अभिनेते भरत जाधव यांची प्रमुख भुमिका असलेले विनोदी नाटक मोरुची मावशीचा नाट्य प्रयोग होणार आहे. दिनांक २ रोजी स्वरनिनाद प्रस्तुत सहसुरांचा इंद्रधनु हा मराठी – हिंदी गाणी -नृत्याचा कार्यक्रम, दिनांक ३ रोजी ऑकेस्ट्रा मेलोडी मेकर्स, दिनांक ४ रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर यांचे किर्तनाचा कार्यक्रम, दिनांक ५ रोजी स्व. लता मंगेसकर यांना आदरांजली वाहणारा स्व. लता मंगेशकरांच्या गाण्याचा कार्यक्रम ‘लतायुग’, दिनांक ६ रोजी आशिका ९० हा गाण्याचा ऑकेस्ट्रा दिनांक ७ रोजी ढोलकीच्या तालावर हा पूनम कुडाळकर व सहकलावंतांचा लावणी नृत्याचा कार्यक्रम, दिनांक ८ रोजी दुपारी ४ वाजता स्थानिक कलावंतांचा क-हेचे कलावंत हा कार्यक्रम व रात्री माया खुटेगावकर, संगीता लाखे, अर्चना जावळेकर, नमीता पाटील यांचा लावणी नृत्याचा कार्यक्रम लख लख चंदेरी दिनांक ९ रोजी विर्सजण होणार आहे. सर्व कार्यक्रम दररोज सायं. ७ वाजता नटराज नाट्य मंदीर, तीन हत्ती चौक येथे होणार आहे. फेस्टीव्हलचे हे १४ वे वर्ष असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले आहे.