प्रतिनिधी – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने मुख्यालयात आयोजित केलेल्या प्रतिष्ठित ‘ग्लोबल शेपर्स अॅन्युअल समिट’मध्ये ग्रामीण आवाजाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान बारामतीच्या लेकीला मिळाला आहे. युवा उद्योजक देवयानी रणजित पवार या आपल्या बारामतीच्या विकासाचा आवाज स्विसरलँड मध्ये मांडणार आहेत. बारामती हब हे भारतातील ग्रामीण भागातील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच पाहिलं हब आहे, त्यामुळे नक्कीच बारामतीकरासाठी हि अभिमानाची गोष्ट आहे. 2020 मध्ये स्थापन झालेल्या ‘ग्लोबल शेपर्स कम्युनिटी’च्या बारामती हबमध्ये निवडून आलेली क्युरेटर असलेली देवयानी WEF मध्ये सप्टेंबरपासून स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे होणाऱ्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण नेत्यांच्या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. क्युरेटरशिप अंतर्गत अनेक वेगवेगळी कामं हाताळण्यात आली. त्या कामांना प्रतिसाद देखील मिळाला. ग्रमीण परिसरातील विकासासाठी 30 पेक्षा अधिक उपक्रम हाती घेतले होते. 30 वर्षाखालील युवा नेत्यांच्या मंचावर ग्रामीण आवाजाचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणार आहे. ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. जे मला ग्रामीण लोकांसोबत काम करताना आले आहेत ते माझे अनुभव सांगणार आहे आणि म्हणून मी सहभागी होण्यास उत्सुक आहे, असं देवयानी सांगते. माझ्यासाठी ग्रामीण युवक, स्थानिक प्रशासन आणि खाजगी संस्थांना एकत्रितपणे सहभागी करून सर्वसमावेशक, प्रगतीशील आणि विकास बनवून माझ्यासारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी काम करणं आणि आणि त्यासाठी मला संधी मिळणं हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. या सगळ्या बारामती हब मार्फत सगळे तरुण एकत्र येतील आणि शाश्वत ग्रामीण भागासाठी काम करतील, अशी अपेक्षा देवयानीने व्यक्त केली आहे.
 या कॉन्फरन्समध्ये देवयानी पवार 600 हून अधिक जागतिक ठिकाणी काम करणाऱ्या अनेक क्षेत्रातील लोकांना भेटू शकणार आहे. त्यांच्या कल्पना जाणून घेणार आहे. भविष्यातील अनेक प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहे.  WEF संस्थापक क्लॉस श्वाब आणि ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या प्रमुख नताली पियर्स यांचे विचार देखील त्यांच्या भविष्यातील प्रवासात महत्त्वपूर्ण ठरतील, ते मला प्रेरणा देणारे असतील असं ती सांगते.

बारामती हबने घेतलेल्या उल्लेखनीय उपक्रमांपैकी सॅनिटरी पॅड्सचे वाटप आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहीम या दोन्हींचा समावेश आहे. त्यांनी सर्वप्रथम झोपडपट्ट्या, गावे आणि ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड वितरण मोहीम हाती घेतली ज्यामध्ये त्यांनी सप्टेंबर 2020 पासून 12-40 वर्षे वयोगटातील 1500 पेक्षा जास्त महिलांना 4000 पेक्षा जास्त पॅडचं महत्व समजून सांगितलं आणि वाटप देखील केलं आहे.
त्यांनी 900+ पेक्षा जास्त देशी झाडे लावली आणि दुष्काळग्रस्त वनजमिनीवर 1000 सीड बॉल्स दिले, ज्यामुळे परिसरात अधिक ऑक्सिजन निर्माण होण्यास मदत झाली. या प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. बारामती  हबने मानसिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, हवामान बदल आणि जैवविविधता संरक्षण यांसारख्या क्षेत्रातही काम केले आहे.आणि अजून हि त्याच जोमाने काम चालू आहे बारामतीच्या ग्रामीण भागाचा शाश्वत विकास कसा होईल याचा प्रामाणिक प्रयत्न बारामती हब चे सर्व शेपर्स करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *