दलित पँथर चळवळीतील योगदानाबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भारत अहिवळे यांचा सन्मान

पुणे दि.२५: ‘दलित पँथर’ या संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यात बाल गंधर्व रंगमंदिर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी दलित पँथरच्या चळवळीमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,अविनाश महातेकर,अर्जुन डांगळे व आदी मान्यवर उपस्थित होते.

आपण गेल्या चाळीस वर्षांपासून महाराष्ट्रातील फुले,शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय असून.मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात देखील अग्रभागी होतो.तसेच दलित पँथरच्या काळात देखील आपण अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला असून हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून गेली अनेक वर्ष माझ्यासोबत चळवळीमध्ये निस्वार्थी आणि स्वाभिमानी पणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा असल्याचे यावेळी भारत अहिवळे यांनी सांगितले.

दरम्यान,या कार्यक्रमाचे आयोजन दलित पँथर सुवर्ण महोत्सव राष्ट्रीय समितीचे बाळासाहेब जानराव,शैलेंद्र चव्हाण,रोहिदास गायकवाड,शिलार रतनगिरी,सुनिल जगताप,संजय सोनवणे,विजय डोळस,असित गांगुर्डे,शैलेंद्र मोरे,परशुराम वाडेकर,प्रकाश साळवे,श्रीकांत लोणारे,माऊली भोसले,अशोक शिरोळे,यशवंत नडगम,राहुल सोनवणे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *