प्रतिनिधी – बारामती तालुक्याचे तहसीलदार विजय पाटील यांनी ओमकार ई-सेवा केंद्र कऱ्हावागज येथे किसान सन्मान निधी योजना कार्यक्रम अंतर्गत लाभार्थी शेतकरी यांचे केवायसी आणि मतदान आधार जोडणी या कामाचा आढावा घेतला. यावेळी क-हावागज गावचे तलाठी बाळासाहेब वणवे, कृषीसहाय्यक संतोष पिसे, ई सेवा केंद्र चालक प्रमोद गावडे, प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र मुलमुले व इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी तहसिलदार म्हणाले कि, किसान सन्मान निधी योजना कार्यक्रम अंतर्गत लाभार्थी शेतकरी यांनी पुढील निधीचे हप्ते सुरु राहणेसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. तरी सर्व यादीतील समाविष्ट शेतकरी यांनी 31आॕगस्टपूर्वी केवायसी पुर्ण करावी. त्याचप्रमाणे मतदान कार्डला आधार लिंक करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *