योजनेचे स्वरुप

योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र, औजारे, पिक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिट्स भाडे तत्त्वावर कृषि यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी व औजारे बँक इत्यादी औजारांसाठी अनुदान देण्यात येते.

योजनेच्या अटी

खातेदार शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्था या योजनेच्या अनुदानास पात्र आहेत. अर्जासोबत ७/१२ व ८ अ चे उतारे व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

योजनेअंतर्गत लाभ

कृषि यांत्रिकीकरण – अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी व महिला यांना ट्रॅक्टरसाठी १ लाख २५ हजार व इतर औजारांसाठी ५० टक्के अनुदान देय आहे. इतर लाभार्थ्यांना ट्रॅक्टर साठी १ लाख व इतर औजारांसाठी ४० टक्केो अनुदान किंवा मंजूर कमाल अनुदान मर्यादा यापैकी कमी असेल ती देय आहे.

औजारे बँकेसाठी – १) १० लाख पर्यंत ४० टक्के अनुदान अर्थात ४ लाख. २) २५ लाख पर्यंत ४० टक्के अनुदान अर्थात १० लाख.

अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *