वास्का इंडियाच्या वतीने बारामतीत कराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न

बारामती : वास्का कराटे असोसिएशनच्या वतीने ९ गटांमध्ये ३६ खेळाडूंची कलर बेल्ट परीक्षा नुकतीच संपन्न झाली. यापैकी २७ खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी दाखविल्याने त्यांना गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ पदक देण्यात आले. श्रेया हाडके हिने येलो बेल्ट परीक्षेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याने परीक्षकांनी तिला ऑरेंज बेल्ट प्रदान केला त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२ ऑगस्ट २०२१ रोजी सायं. ४ ते रात्रौ. ८ वाजेपर्यंत वीरशैव मंगल कार्यालय, भिगवण रोड, बारामती या ठिकाणी वर्ल्ड ऑथोरीटी शोतोकॉन कराटे-दो असोसिएशन इंडिया च्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती.
बारामतीच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा ताई तावरे, नगरसेविका सौ. अनिताताई जगताप, विद्या प्रतिष्ठानचे विश्र्वस्त श्री. मंदार सिकची, पत्रकार श्री. अमोल यादव यांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल व बेल्ट प्रदान करण्यात आले.
येलो बेल्ट गट नं.१- शौर्य खंडाळे (गोल्ड), ध्रुवा उंडे (सिल्व्हर), आतिफ पठाण व आरूष जाधव (ब्राँझ)
येलो बेल्ट गट नं.२- रुद्र भगत (गोल्ड), सक्षम जगताप (सिल्व्हर), सृष्टी गावडे (ब्राँझ), स्वरा अहिवळे (चौथा क्र.), आराध्य खोपकर (पाचवा क्र.)
येलो बेल्ट गट नं.३- श्रेयस हाडके (गोल्ड), प्रसाद राऊत (सिल्व्हर), आर्या सोनी (ब्राँझ), अंजली शेरकर (चौथा क्र.), युतिका राजमाने (पाचवा क्र.)
येलो बेल्ट गट नं.४- श्रेया हाडके (गोल्ड), अदिती शेरकार (सिल्व्हर), रणवीर शेरकर (ब्राँझ), अंकुर खंडाळे (चौथा क्र.)

ऑरेंज बेल्ट गट नं.१- मनस्वी गावडे (गोल्ड), अविराज गावडे (सिल्व्हर), जान्हवी देवमाने (ब्राँझ)
ऑरेंज बेल्ट गट नं.२- स्वराज जाधव (गोल्ड), सर्वज्ञ जाधव (सिल्व्हर), मयुरेश म्हस्के (ब्राँझ)
ऑरेंज बेल्ट गट नं.३- रियांश सिकची (गोल्ड), संस्कृती जाधव (सिल्व्हर), रुद्र पानसरे (ब्राँझ), रेवा भारकड (चौथा क्र.)
ऑरेंज बेल्ट गट नं.४- अशिलेष साळुंखे (गोल्ड), श्रुती भारकड (सिल्व्हर), गायत्री गावडे (ब्राँझ), विराज वागडोले (चौथा क्र.)

ग्रीन बेल्ट गट नं.१- उमर खान (गोल्ड), राजन खराडे (सिल्व्हर), कुलसुम खान व सोहम माने (तिसरा क्र.)
परीक्षक म्हणून वास्का इंडिया सातारा जिल्ह्याचे सचिव श्री. धीरज कदम व श्री. सुशांत पोल यांनी काम पाहिले. सर्व यशस्वी खेळाडूंना वास्का कराटे असोसिएशनचे प्रमुख मार्गदर्शक व बारामती कराटे क्लबचे प्रमुख प्रशिक्षक शिहान मिननाथ भोकरे, क्लास इन्चार्ज व प्रशिक्षक सौ. शिवानी काटे कदम व अनिकेत जवळेकर, सह-प्रशिक्षक अमृता खोपकर, मंथन भोकरे, रोहन भोसले व शतृंजय शर्मा यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *