योजनेचे स्वरुप
भाजीपाला पिकांची किडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे. रोपवाटीकेद्वारे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे व पीक रचनेत बदल करून नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे
योजनेच्या अटी
प्रथम प्राधान्य कृषि पदवीधर महिला. द्वितीय प्राधान्य कृषि पदविका महिला, तृतीय प्राधान्य महिला शेतकरी गट व त्यानंतर इतर लाभार्थी या योजनेच्या अनुदानास पात्र आहेत.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
◆ ७/१२ व ८ अ चे उतारे
◆ आधार कार्डची छायांकित प्रत
◆ आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
◆ अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाकरिता संवर्ग प्रमाणपत्र
योजनेअंतर्गत लाभ
१० आर शेडनेट, १० आर पॉलिटनेल, ६२ प्लास्टिक क्रेट व पॉवर नॅपसॅक स्प्रेअर आकारमानाच्या ४ लाख ६० हजार प्रकल्प खर्चास २ लाख ३० हजार अनुदान देण्यात येते.
अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा