पुणे, दि.१९: विभागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमास तसेच महाविद्यालयामध्ये, संस्थेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी संस्था, महाविद्यालयांबाबत विद्यापीठ अथवा सहसंचालक कार्यालयाकडून खात्री करुन घ्यावी.
राज्यातील काही संस्थामार्फत विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोग, ए.आय.सी.ई.टी.मान्यता प्राप्त नसलेल्या संस्थेकडून अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहे. त्यांच्याकडून शिक्षण व इतर शुल्क आकारले जाते. त्यामुळे अशा अनाधिकृत संस्थामध्ये, अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे. हे लक्षात घेता विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना आधी पूर्ण माहिती घ्यावी, असे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी कळविले आहे.