नानासाहेब साळवे
बारामती – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या सी बी एस सी परीक्षेचा निकाल दि. ३ ऑगस्ट रोजी जाहीर केला यामध्ये बारामतीतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत या वर्षी ही शाळेचा शंभर टक्के निकाल लावून उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे
सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून शाळेतील पूर्वा जरांडे या विद्यार्थिनीने 96 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे
तनिष्क चांदगुडे यांनी 94 टक्के गुणांसह द्वितीय
श्रीपाद वणवे 93.80 टक्के गुणांसह तृतीय
दिग्विजय मुळे यांने 93.40 गुण मिळवून चौथा तर प्रणवकुमार सलगर यांचे 91.60 गुणासह पाचवा क्रमांक मिळवला आहे
शाळेमध्ये वर्षभरात घेण्यात आलेल्या ऑनलाईन व ऑफलाईन ,प्रथम, द्वितीय सराव प्रत्यक्षीक परीक्षेत मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे
विद्यार्थ्यांचे यशाबद्दल सरव्यवस्थापक डी एस जे फ्रेंक्लिन प्राचार्य तुषार कुलकर्णी समन्वयक माधुरी क्षीरसागर, प्रणिता भोसले,नलिनी भदाने वसुधा राऊत प्रशासकीय अधिकारी शेखर तुपे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.