बारामती: स्वातंत्र्याचा ७५ वर्षपूर्तीच्या अभिमानी क्षणाचे आपण साक्षीदार झालो. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि सगळीकडे हर्षोल्लास असुन १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे तर तसेही नेहमीच आनंदोत्सात साजरे होणारे राष्ट्रीय सण आणि यावर्षी तर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हटल्यावर उत्साहाला सिमा नव्हती. प्रत्येक सार्वजनिक उपक्रमात,मग तो कोणत्याही जातीधर्माच्या असो कायम अग्रभागी असणारे ‘यादगार सोशल फौन्डेशन’ यावेळीही मागे न राहता.’दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ अशीच सगळ्यांची अवस्था असताना पहाटे पासून र्फौन्डेशच्या सर्व सदस्यांची धावपळ सुरु होती.स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्ताने संकलप्ना केली होती. बारामती शहराला रोज स्वच्छ ठेवणाऱ्या श्रमणाऱ्या हातांना म्हणजेच’ स्वच्छता दूतां’ना मिठाई वाटप करणे. त्यानुसार मिठाई बॉक्स बनवून अगदी पहाटेच या दूतांना ही छोटीशी कृज्ञतापूर्वक दिलेली भेट देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांना, दोघांना सुखावून गेली.
यादगार फाउंडेशनने स्वच्छता दुत ३५०, तसेच प्रभाग १६ मधील ७४० कुटुंबांना असे एकुण १०९० कुटुंबांना मिठाईची गोड भेट देत स्वातंत्र्याचा आनंद द्विगुणित करण्याचे प्रयत्न केले.
यावेळी स्वातंत्र्याचा ७५ वर्षपूर्तीच्या अभिमानी क्षणाचे आपण साक्षीदार बनू शकल्याचा आनंदही सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळकताना पाहायला मिळाला.हा आनंद पाहता आपण ही समाधानी झालो असल्याचे यादगार सोशल फाउंडेशन अध्यक्ष फिरोज बागवान यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.