स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी दिनानिमित्त व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिद्धीविनायक फाउंडेशन व कसबा क्रिकेट क्लब च्या वतीने या स्पर्धाचे आयोजन

बारामती: देशाच्या अमृतमहोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व बारामतीचे लाडके सुपुत्र मा.अजित पवार सोा यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमीत्त सिद्धीविनायक फाउंडेशन बारामती व कसबा क्रिकेट क्लब बारामती यांच्या वतीने श्री सचिन सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धिविनायक फौडेशन व कसबा क्रिकेट क्लब यांनी बारामती येथे तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धेच आयोजन केले होते.
बारामती तालुक्यांतील ग्रामीण भागासह बारामती शहरातील म.ए.सो.हायस्कूल, विद्या प्रतिष्ठानच्या सर्व शाळा, विनोदकुमार गुजर बालविकास,टेक्नीकल हायस्कूल,शाहू हायस्कूल , धों.आ.सातव हायस्कूल , शारदानगर,एकता इग्लीश स्कूल,जि.प. शाळा ढवाणवस्ती व सर्व नगरपरिषद शाळांनी यांत सहभाग नोंदवला.विविध भागातून आलेल्या १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी चार गटामध्ये परिक्षा देत सिद्धिविनायक फाउंडेशन च्या या उपक्रमाला प्रत्येक कार्याक्रमा प्रमाणे यावेळी देखील उस्फूर्त पणे प्रतिसाद दिला. आपेक्षा पेक्षा ४ पट विध्यार्थी म्हणजेच २००० पेक्षा अधिक विद्यार्थांनी आपला सहभाग नोंदवला. आज पर्यंत चा सगळ्यात मोठा तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा कार्यक्रम दि.१६/८/२२ रोजी न्यू धनाई अक्षदा मंगल कार्यालयामध्ये पार पडला.
या कार्यक्रमासाठी व सर्व लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बारामती नगरीच्या माजी नगर सेविका सई सातव, आरती सातव, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन श्री सचिन सातव, बाळासाहेब चव्हाण पाटील,दिलीप ढवाण पाटील नारायन भाऊ तुपे , दशरथ पवार तसेच बारामती व ग्रामीण भागातील सर्व शाळेतील शिक्षक वर्ग तसेच सिद्धिविनायक फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश जोजारे ,कसबा क्रिकेट क्लब चे सूरज ओवाळ,करिम तांबोळी, जमीर महत, प्रतिक जोजारे, रोहित साळुंखे व इतर सभासदांनी स्पर्धा पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले.यावेळी सिद्धिविनायक फाउंडेशन व कसबा क्रिकेट क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *