अमृतमहोत्सवा निमित्ताने तुषार भाऊ शिंदे युवा मंच ने आयोजित केली भव्य बाईक रॅली …

प्रतिनिधी – यंदा संपूर्ण देशात 75वा स्वतंत्र दिन अमृतमहोत्सव म्हणून साजरा करण्याचे शासनाने निर्देश दिल्यापासून गावागावात अत्यंत उत्स्फूर्तपणे ग्रामस्थांनी वेगवेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे तुषार भाऊ शिंदे युवा मंच यांच्या वतीने काल 75 व्या स्वातंत्र्य दिन व अमृतमहोत्सव निमित्ताने भव्य बाइक रॅली काढण्यात आली. त्यावेळी ग्रामपंचायत, सरकारी हॉस्पिटल तसेच जिल्हा परिषद शाळां या ठिकाणी भेट दिली. या बाईक रॅली मध्ये परिसरातील ग्रामस्थ व तुषार भाऊ शिंदे युवा मंचचे सर्व कार्यकर्ते आणि गावातील तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अत्यंत खेळीमेळी च्या वातावरणात ही रॅली संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *