योजनेचे स्वरुप
◆अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत दोन दुधाळ जनावरांची गट वाटप योजना. दोन एच. एफ. किंवा जर्सी जातीच्या दोन संकरित गाई किंवा मुऱ्हा अथवा जाफराबादी या सुधारित जातीच्या दोन म्हशी, किंवा गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी प्रजातीच्या दोन देशी गाई वाटप योजनेंसाठी ७५ टक्के अर्थसहाय्य.
लाभार्थी निवड प्रवर्ग
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध प्रवर्गातील :
• दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी,
• अत्यल्प, अल्प भूधारक,
• रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगार
• वरील सर्व वर्गात मोडत असलेले महिला बचत गटातील लाभार्थी
अटी व शर्ती
◆अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे
◆लाभार्थी निवडतांना ३० टक्के महिला आणि ३ टक्के दिव्यांगांना प्राधान्य.
◆ आधारकार्ड, मोबाईल नंबर, ७/१२ व ८-अ उतारे अनिवार्य.
◆शिधापत्रिकेची सत्यप्रत, राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक सत्यप्रत, अर्जदाराचे छायाचित्र, जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास दाखला.
◆लाभार्थ्यांची निवड झाल्यावर एका महिन्यात लाभार्थ्यांचा हिस्सा किंवा बँकेचे कर्ज उभारणे आवश्यक.
अधिक माहितीसाठी संपर्क: जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किंवा पशुधन विस्तार अधिकारी, तालुका पंचायत समिती