प्रतिनिधी – स्व. ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक नामदेवराव चौधरी (आण्णा ) विचार मंच व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन, अमृतमहोत्सव आणि वर्धापन दिन दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी गावातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक शिवश्री साहेबराव नाना दळवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शिवश्री गणेश इंगळे पोलीस अधीक्षक बारामती, मा. शिवश्री संभाजी नाना होळकर अध्यक्ष बा.रा. काँ.प., शिवश्री जयसिंग बबलू देशमुख मा. नगरसेवक बारामती, शिवश्री बाळासाहेब सलोदे सरपंच डोर्लेवाडी आणि गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते.