खंडोबानगर मध्ये महिलांवर झालेल्या हल्ल्याची मानवी हक्क आयोगाकडे करणारं तक्रार

बारामती (प्रतिनिधी : रियाज पठाण.) खंडोबानगर येथे सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेला काळीमा फासणारी घटना घडली अवैध पिग फार्म ची तक्रार का केली म्हणून स्थानिक तक्रारदार महिलांवर पिग फार्म चे मालक आणि समाज कटंक यांच्याकडून अमानुष भ्याड हल्ला करण्यात आला.
या संदर्भात सदर पिडीत महिला व स्थानिक रहिवासी यांची मानवी हक्क कार्यकर्ते मुनिर तांबोळी यांनी भेट घेतली
व सदर घडलेल्या घटनेची माहिती घेऊन राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी तक्रार पिडीत महिला व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *