प्रतिनिधी – पर्यावरणाशी मैत्री करूया व जीवन समृद्ध करूयात या ओळी प्रमाणे मैत्री दिनाच्या निमित्ताने पर्यावरणा सोबत प्रत्येकाने नाते बनवावे, जपावे, त्याचे संगोपन करावे, यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्य हिच ओळख फाउंडेशन व बारामती पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फ्रेंडशिप डे च्या दिवशी वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये वड, करंज, कडुलिंब, पिंपळ, उंबर अशी ७५ देशी प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे सर, पाणी फौंडेशनचे लाड, सागर जाधव, समीर बनकर व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम बनकर वस्ती उंडवडी येथे संपन्न झाला .