प्रतिनिधी – दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी ०८:३० वा चे सुमारास खबर देणार सौ. शामल अमोल पवार, पोलीस पाटील पोंधवडी, बंडगरवाडी यांनी खबर दिली की, मौजे पोंधवडी गावचे हददीत बंडगरवाडी येथे पुणे
सोलापुर हायवे रोड लगत कि.मी नंबर. १०३/३३० चे तीन मोऱ्या असलेल्या पुलाचे जवळ सर्व्हिसरोड लगत एक पुरूष इसम मयत स्थितीत अंदाजे ५० ते ५५ वर्ष, अंगाने मजबुत त्याचे नेसणीस आकाशी रंगाचा फुल
बाहयांचा शर्ट, निळसर उभ्या रंगाची पॅन्ट असे वर्णनचा मयत आहे. यातील अनोळखी मयताचे जवळ काहीच मिळुन आले नाही त्यामुळे त्याची ओळख पटविणे पोलीसांचे समोर एक चॅलेंज निर्माण झालेले असताना मा. दिलीप पवार साो, सहा पोलीस निरीक्षक यांनी तपास पथक टिम तयार करून पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी चिंचवड परीसरामध्ये सलग तीन दिवस मयताची प्रसिध्दी करून तसेच अतिशय सचोटीने व बारकाईने तांत्रिक विश्लेषन, विविध ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज व गोपनिय बातमीदारा मार्फेत माहीती काढुन आकाश वामन काळोखे, वय २३ वर्ष, व्यवसाय शेती, रा. देहुगाव,
विठठ्लवाडी, ता. हवेली, जि.पुणे यास देहुगाव, विठठ्लवाडी येथुन ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल चौकशी केली असता तो उडवाउडविची उत्तरे देवु लागला. परंतु त्यास पोलीसी खाक्या दाखविताच तो पोपटा सारखा बोलु लागला व त्याने कबुली दिली की, दिनांक ०७/०७/२०२२ रोजी सकाळी ०८:०० वा चे सुमारास मौजे देहुगाव, विठठ्लवाडी, ता.हवेली, जि. पुणे येथे त्याचे राहते घराचे पार्कींगचे जवळ त्याचे मालकिचा उभा असलेल्या ट्रॅक्टर नं.एम.एच.१४/ जी. वाय. ५४२९ चे ट्रॉलीची लोखंडी प्लेट मयत नामे अरूण सिंह, वय ५३ वर्ष, रा. बब्बन सिंह, गांव भेदौरा, पोस्ट भेदौरा, बसेवा, आजमगढ, उत्तर प्रदेश हा चोरून घेवुन जात असताना त्यास पकडुन त्यास हाताने, लाथांनी त्यांचे तोंडावर तसेच लोखंडी टॉमीने त्याचे कपाळाचे वर डोक्यात तसेच उजवे कानाचे पाठीमागे मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खुन केला. त्यानंतर मयत इसमाची
परीसरामध्ये ओळख पटु नये म्हणुन स्वतःचे वेरना गाडी नंबर. एम. एच.१४/ डी. एन. ८७९७ ही मध्ये त्यास दिवसभर ठेवुन दिनांक ०८/०७/२०२२ रोजी रात्रौ १० वा चे सुमारास त्यास स्वतःचे वेरना गाडी नंबर. एम.
एच.१४/ डी.एन.८७९७ ही मधुन देहुगाव, विठ्ठ्लवाडी येथुन सुमारे १५० किलो मीटर अंतरावर आणुन मौजे पोंधवडी गावचे हदद्दीत बंडगरवाडी येथे पुणे सोलापुर रोडचे किमी नंबर. १०३/३३० चे सव्र्हस रोडचे चे लगत तीन मोन्या पुलाचे जवळ त्याची मयत बॉडी टाकुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. यातील आरोपी मजकुर याचे कडुन गुन्हा केलेले ठिकाण, तसेच गुन्हा केले नंतर मयत बॉडी टाकलेले ठिकाण
व त्याने करण्यासाठी वापरलेले हत्यार लोखंडी टॉमी व वेरना गाडी नंबर. एम. एच. १४/ डी. एन. ८७९७ ही त्याचे ताब्याततुन जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणुन भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नंबर.
१९२ / २०२२ भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी नामे आकाश वामन काळोखे, वय. २३ वर्ष, व्यवसाय शेती, रा. देहुगाव, विठठ्लवाडी, ता. हवेली, जि. पुणे यास सदर गुन्हयात अटक केली. गुन्हयाचा पुढील तपास मा. दिलीप पवार, सहा पोलीस निरीक्षक, भिगवण पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. मिलींद मोहीते, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. गणेश इंगळे सो, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, सहा. पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टे, भिगवण पो.स्टेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष रूपनवर, पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, अक्षय कुंभार, गणेश पालसांडे यांनी केली आहे.