माळेगाव (प्रतिनिधी : गणेश तावरे ) युवा चेतना ही संस्था मागील दोन वर्षांपासून बारामती मध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत आहे. या संस्थेचे मनोज पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा चेतना द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 75 बाटल्यांचे रक्त संकलन झाले आहे. या कार्यक्रमा चे अध्यक्ष राष्ट्रवादीचे पदाधिकारी संभाजी नाना होळकर यांनी केलं आणि शंकर नागरी पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय येळे सर याच्या अध्यक्षतेखाली झाले आधी युवा चेतना टीम उपस्थित होते.
कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असताना युवा चेतना द्वारे घेण्यात आलेले रक्तदान शिबीर हे नक्कीच कौतुकास्पद आहे असे मत मान्यवरांनी मांडले. भविष्यातही युवा चेतना असेच सामाजिक कार्यात अग्रेसर राहून गरजवंतांना उपयोगाला नक्की येईल असा विश्वास युवा चेतना च्या सदस्यांनी दिला.