बारामती कृषी महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

प्रतिनिधी – महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबलटेनिस स्पर्धेत कृषी महाविद्यालय, बारामती येथील मुली व मुले यांनी घवघवीत यश संपादन केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबलटेनिस क्रीडा स्पर्धा कृषी जैव तंत्रज्ञान बारामती येथे नुकत्याच पार पडल्या व या स्पर्धेमध्ये बारामती कृषि महाविद्यालयाचे एकूण २० विद्यार्थी सहभागी झाले होते, यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. बॅडमिंटन मुले सुवर्णपदक पार्थ राऊत, राहुल अडागळे, पार्थ जाधव, तन्मय अगवाण, हिमांशु पदमे, बॅडमिंटन मुल रौप्यपदक प्रतिक्षा मोहीते, साक्षी घुले, राजलक्ष्मी राऊत, अपेक्षा हरगुडे, दौंडकर रुचिता, टेबल टेनिस मुली कास्यपदक अपेक्षा हरगुडे, दौंडकर रुचिता, तेजस्विनी मारकड, सायली अकोटकर, प्रितम अल्हाट वरील विद्यार्थ्यांनी उत्कुष्ट कामगिरी केली व यातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या वरील विद्यार्थ्यांना बाळू आदलिंगे व श्री अक्षय तावरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन मा. राजेंद्र पवार , विश्वस्त मा. सौ. सुनंदा पवार, प्रा. एन. ए. नलावडे, (सीईओ अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट), प्रा. प्रशांत तनपुरे (समन्वयक, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट), प्रा. एस. पी. गायकवाड, उपप्राचार्य (कृषि महाविद्यालय), प्रा. जया तिवारी, (प्राचार्य कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय ) यांनी वरील खेळाडु विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *