प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे काल लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली, या कार्यक्रमास कु.पृथ्वीराज शेलार, कु.प्रतीक्षा नेटवे, कु.सोनिया आटोळे यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती दिली, तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री सरतापे यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे काही प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये मा. प्राचार्य बी.एन.पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व विचारवंत साहित्यिक व समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच भारतीय स्वातंत्र्य सेनानी जहाल मतवादी केसरी वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शिक्षक प्रतिनिधी जी.आर. तावरे, सहशिक्षक. एस.एम.जाधव, ए. ए. कोकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एन. जी. गायकवाड यांनी केले तर आभार श्री के एल आटोळे यांनी मांडले.