प्रतिनिधी – एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर साजरी होत आहे त्यामुळे लोकां मध्ये उत्साह असल्याने एक तारखेला होणाऱ्या मिरवणूक व प्रतिमापूजन कार्यक्रमाच्या अनुषंगाने बारामती शहर पोलीस ठाण्यास सर्व शांतता कमिटी सदस्य सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते आयोजक यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये प्रामुख्याने मिरवणुकीमध्ये कोणत्याही ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कुणीही मद्यपान करून मिरवणुकीमध्ये सामील होऊ नये तसेच मिरवणुकीसाठी कोणत्याही प्रकारचा वाहतूक अडथळा होऊ नये यासाठी पोलिसांनी ट्राफिकचे नियोजन करावे तसेच नगरपालिकेने रस्त्यावर असणारे खड्डे बुजवावेत महावितरण ने त्यादिवशी कोणत्याही प्रकारे विजेच्या प्रवाहामध्ये खंडित होणार नाही याबाबत काळजी घ्यावी त्याबाबत पोलीस ठाण्यातील संबंधित विभागांना पत्र देण्यात येणार आहेत तसेच मिरवणूक वेळेत काढून दहा वाजता संपवावी या आणि अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची साहित्य व विचार प्रत्येक घराघरात पोहोचवावा असा सर्वांनी एकमताने निर्धार केला सर्व सदस्य कार्यकर्ते यांनी पोलिसांना मिरवणुकीच्या दिवशी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले मिरवणूक मीटिंग शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली