प्रतिनिधी – राज्यात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी हात व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना उपजिवीकेसाठी धडपड करावी लागते. एक सामाजिक बांधिलकी म्हणून पै. सार्थक फौंडेशनच्या वतीने १० गरजु कुटुंबांना किराणा वाटप करण्यात आले. पै. सार्थक फौंडेशन म. राज्य ही सामाजिक संस्था असुन वर्षभर या फौंडेशनकडून विविध उपक्रम राबविले जातात. पै. सार्थक फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष – पै. गणेश आटपडकर, उपाध्यक्ष – पै. तात्यासाहेब राणे, कार्याध्यक्ष – अमोल कुलट , सहकार्य अध्यक्ष- धिरज संकट, डॉ. अक्षय कर्चे, गोपी पडकर, योगेश महाडिक , व सर्व फौंडेशनचे पदाधिकारी यांनी या उपक्रमात सहभागी होऊन गरजुंपर्यंत मदत पोहचवण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *