प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते श्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 3 मधील नवज्योत महिला सोसायटी व तांबे नगर या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष श्री किशोर जी मासाळ, बारामती नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक श्री. सुधीरजी पानसरे, बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री हनुमंत निंबाळकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना बारामती तालुकाध्यक्ष एडवोकेट निलेश वाबळे, आय काँग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष रोहित भैया बनकर, श्री शरद नामदे संचालक सत्यमेव करिअर अकॅडमी, अमोल काका पिसाळ, श्री शेखर सातकर, अक्षय काका थोरात, हर्षवर्धन शितोळे महेश शिंदे हे या कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते. या शिबिरात परिसरातील जवळजवळ 300 ते 400 नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन शुभम भैय्या मोरे व मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *