सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केल्यामुळे सर्वांनीचं महेश गायकवाड यांचे केले कौतुक….

प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा वाढदिवस बारामती मध्ये वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, अनाथ मुलांना भोजन, यासह अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. श्री दत्त समिती वसंतनगर चे अध्यक्ष महेश अरविंद गायकवाड यांनी मिशन बोर्डिंग होम येथील अनाथ मुलांना स्नेहभोजन तसेच वृक्षारोपण करून आपल्या नेत्याप्रति प्रेम व्यक्त केले व यानंतर वसंतनगर येथील समाज हॉलमध्ये, समाजातील विधवा महिलांना हळदीकुंकू लावून जुन्या रूढी परंपरांना तिलांजली देऊन विधवा प्रथा बंद करण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न या निमित्ताने केला असून सदर उपक्रम रविवार दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महेश गायकवाड यांनी आयोजित केला होता . यावेळी प्रमुख उपस्थिती संजय जाधव ( गट शिक्षण विस्ताराधिकारीगट शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती बारामती), अनिल कोंडीबा गायकवाड( रिटायर एक्साईज इंस्पेक्टर), अनिल चंदुलाल जाधव( राष्ट्रपती पदक विजेते), सुभाष मुक्ताजी गायकवाड( माजी शिक्षण विस्तार अधिकारी बारामती), कुसुम अरविंद गायकवाड( माजी शिक्षण विस्तार अधिकारी), महेंद्र गायकवाड., सुरेंद्र गायकवाड., सयाजी वसंत गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते). यासह मोठया प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *