प्रतिनिधी – मौजे क-हावागज तालुका बारामती येथे आठवडी बाजारात कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पिक विमा योजनेचा प्रचार व प्रसिध्दी करून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग पिक प्रात्यक्षिके , शेतीशाळा , शेतकरी मेळावे,शेतकरी सहली व अशाच प्रकारच्या विविध विस्ताराच्या योजना राबवून प्रयत्न करत असतो. खरीप हंगाम पिक विमा योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असुन सदर योजना शेतकऱ्यापर्यत पोहचवण्यसाठी संतोष पिसे कृषी सहाय्यक क-हावागज यांनी शनिवारी भरणा-या आठवडी बाजारात थांबून शेतकऱ्यांना पिक विमा योजनेची माहीती दिली.तसेच भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकरी बांधवांना योजनेचे पोस्टर वाटप करून पिक विमा योजनेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन अरविंद यमगर मंडळ कृषी अधिकारी उंडवडी सुपे व किसन काझडे कृषी पर्यवेक्षक उंडवडी सुपे यांचे मार्गदर्शनखाली करण्यात आले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रगतीशिल शेतकरी मच्छिद्र मुलमुले,गणेश धोञे, प्रमोद गावडे, बाळू लोणकर, प्रशांत बनकर, हनुमंत बनकर व इतर शेतकरी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *