बारामती (प्रतिनिधी, गणेश तावरे ) बारामती नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा -३ अभियान अंतर्गत वार्ड निहाय स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात येत असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि.२२ जुलै रोजी प्रभाग क्रमांक १० मधील कारभारी नगर, जामदार रोड, विठ्ठल प्लाझा परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानाची सुरुवात प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवक मा.सुरज सातव, नगरसेवक संतोष जगताप, नगरपरिषदेचे स्वच्छता विभागाचे अधिकारी सुभाष नारखेडे व नगरपरिषदेचे स्वच्छता विभागाचे इतर कर्मचारी, श्री काशीविश्वेश्वर तरुण मंडळाचे कार्यकर्ते, धों आ. सातव (कारभारी) हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक यांच्या, प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.याशिवाय या अभियानात प्रभाग क्रमांक दहा मधील स्थानिक नागरिकांनीही आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छता करून आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी श्री काशीविश्वेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक सुरज सातव, खजिनदार सचिन सस्ते,संतोष जाधव, अविनाश सावंत,हनुमंत शिंदे, संजय सातव,ओंकार चव्हाण, राजेंद्र भापकर, महावीर गायकवाड, नहार काका, बाळासाहेब सातपुते, अविनाश टाळकुटे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *