प्रतिनिधी- मा. शरदचंद्र पवार युथ फाउंडेशन यांच्यामार्फत काल वाई पश्चिम भागामध्ये आपदग्रस्तांना छोटीशी मदत करण्यात आली. वाईच्या पश्चिम भागात आलेले आसमानी संकट हे पूर्ण भयानक असलेले काल निदर्शनास आले. गोळेवाडी व गोळेगाव परिसरात या ठिकाणी जाऊन मा. शरदचंद्र पवार युथ फाउंडेशन यांनी जीवनावश्यक वस्तूंचे 40 किट वाटप केले.
मा. शरदचंद्र पवार युथ फाउंडेशन चे वाई तालुका टीम देखील तेथे होती. पूजा भंडलकर, प्रणाली कदम, धनाजी पवार, प्रतीक अक्कर, ज्योती जगताप, अर्पिता गायकवाड, एकता निकम, चेतन देसाई, गिरीश सोनवणे, अक्षय गुरव, दीपक शिंदे,अथर्व अक्कर,सुरज कनिचे,अनिकेत गंगावणे हे सर्व सदस्य उपस्थित होते. मा. शरदचंद्र पवार युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रतिक अक्कर म्हणाले की ही आत्ताची वेळ जरी तुमच्यावर असली तरी यामध्ये आम्ही तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करू तसेच आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी मदत घेऊन येण्याचा प्रयत्न करू. जीवनावश्यक वस्तूंमध्ये गहू, तांदूळ, साखर, हुलगा, मुगडाळ,एक चहापुडा, एक चटणीचा पुडा, एक मिठपुडा, हळद पावडर, तसेच बिस्किट पुडा असे 40 किट वाटप करण्यात आले. तेव्हा लोकांची घरे,शेती,बंधारे, रोड वाहून गेलेले आढळून आले. गावचे सरपंच अजय कदम यांनी आमच्या सर्व टीमला गावातील सर्व परिस्थिती बद्दल सांगितले व त्या ठिकाणी घेऊन गेले. तेव्हा तेथे सरपंच अजय कदम, उपसरपंच जितेंद्र गोळे,सूरज कदम, तसेच युवा वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.
तेव्हा गावातील लोक हे अजून देखील भीतीच्या छायेत आहेत असे जाणवले व ग्रामस्थांनी मा. शरदचंद्र पवार युथ फाउंडेशन यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *