प्रतिनिधी- काल दिनांक 19 जुलै रोजी मौजे पारवडी ता. बारामती येथील कोकने वस्तीवर प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन कृषि सहाय्यक श्री. यु. सि चौधर व कृषि पर्यवेक्षक श्री.ए. बी घोळवे यांनी पिक विम्याचे महत्व व पिक विम्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME), महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना, विहीर पुनर्भरण योजना, गांडूळ कल्चर, नाडेप कंपोस्ट खत युनिट,खरीप पिक विमा योजना, एकरी शंभर टन ऊस उत्पादन कार्यक्रम, खोडवा ऊस खत व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी कृष्णा शिंदे,राजेंद्र कोकणे, अर्जुन कोकणे,तुकाराम आटोळे, ज्ञानदेव आटोळे, बाबुलाल गावडे, सुधीर गावडे ई ऊस उत्पादक शेतकरी हजर होते.