प्रतिनिधी – दिनांक 17 जुलै रोजी परतीच्या प्रवसास निघालेल्या जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी च्या वारकर्यांच्या सेवेसाठी काल सालाबाद प्रमाणे “सस्ते वड़ेवाले “यांच्या तर्फे गणेश भाजी मंडई गुणवडी चौक येथे 500 भजीपाव वाटन्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला. परतीच्या प्रवासात निघालेल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून योगेश सस्ते आणि सस्ते परिवार गेले 10 वर्ष झाले. हा उपक्रम राबवत आहेत. आणि या नित्य क्रमासाठी ह.भ. प भानुदास महाराज मोरे ( संत तुकाराम महाराजांचे वंशज ) यांचे आशीर्वाद घेतले.

या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन नवनाथ (अण्णा ) सस्ते, ह.भ. प पांडुरंग (अण्णा ) आटोळे, श्री नवनाथ गजाकस, विशेष सहकार्य शिवसाम्राज्य प्रतिष्ठान आणि Y ग्रुप बारामती यांचे विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *