शिरूर लॉकअप मधून पळून गेलेला आरोपी अखेर जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा व शिरूर पोलीस स्टेशन ची दमदार कामगिरी

प्रतिनिधी – दिनांक 22/6/22 रोजी रात्रौ 02.00 वा.चे दरम्यान शिक्रापूर पोलिस स्टेशन मधील आरोपी रोहन उर्फ बंटी बिरू सोनटक्के वय 22 वर्ष रां. मुरूम तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद हा अटकेत असताना रात्री चे वेळेस शिरूर लॉकअप मधून पळून गेला होता. सदर आरोपी चे विरोधात शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा राजी नंबर 449/2022 भा द वी 224,109,114 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी तपासाबाबत सूचना व मार्गदर्शन करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. सदर पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवत गोपनीय बातमीदारांना सूचना देऊन तपास करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी हा कळंब ता. इंदापूर जिल्हा पुणे येथे असल्याची गोपनीय माहिती तपास पथकास मिळाली. सदर माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिस स्टेशन चे पथकाने सापळा रचून आरोपीस कळंब येथून शिताफीने पकडुन त्याचे कडे असलेले फोर्ड इकॉस्पोर्त एम एच 31.एफ इ 0032 याचे सह ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री डॉ. अभिनव देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मितेश घट्टे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे, यशवंत गवारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग, श्री अशोक शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक श्री.सुरेशकुमार राऊत शिरूर पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोसई गणेश जगदाळे, सहा.फौजदार बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार अजित भुजबळ, पोलीस नाईक अमोल शेडगे, पोलीस नाईक अभिजित एकशिगे, पोलीस नाईक स्वप्नील आहिवळे तसेच शिरूर पोलिस स्टेशन चे पोसई अभिजित पवार, पोलिस नाईक जगताप यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *