प्रतिनिधी – राज्यात भासत असणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता युवा चेतना सामाजिक संस्था, सनज्योत बहुउद्दशीय संस्था व नागेश गावडे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राजहंस डेअरी हॉल माळेगाव येथे पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन डी.वाय.एस.पी गणेश इंगळे यांच्या हस्ते पार पडले . या वेळी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉक्टर आशुतोष आटोळे यांचे मोफत दंतरोग तपासणी शिबिर या वेळी आयोजित करण्यात आले होते. दिवसेंदिवस रक्तसाठेंची कमतरता जाणवत असल्यामुळे या शिबिराचं आयोजन करण्यात आले असे मत संस्थेच्या पदाधिकऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी संभाजी होळकर, राहुल घुघे ,विराज धुमाळ, आप्पा हिंगासे, प्रमोद जाधव, विशाल मापटे ई उपस्थित होते. या कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून मनोज पवार, सारिका आटोळे, नागेश गावडे, प्रज्ञा काटे, सतीश पवार , ऋतिक बिजागरे, प्रीतम शिवरकर , सिद्धी तावरे , गौरी गुरव ,रागिणी वसव, सुषमा बनकर , अश्विनी कश्यप , आकांक्षा सोनावणे, आर्यन काटे, स्नेहा आवाडे,ओंकार शितोळे, स्वप्नील शितोळे, स्वप्नील शितोळे, मोहित शिरोडे ई.सदस्य उपस्थित होते.