प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह आणि कृषि दिन 2022-23 अंतर्गत दिनांक. 01जूलै 2022 रोजी मौजे. लाटे तालुका बारामती, येथे पार पडला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मा. श्री पी एस माने कृषि पर्यवेक्षक वडगाव नि. 1, यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब व ऊस पाचट व्यवस्थापन, हुमणी नियंत्रण प्रकाश सापळे, एकरी 100 टन ऊस उत्पादन अभियान, सोयाबीन बीज प्रक्रिया, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, PMFME, MAHADBT अंतर्गत राबवण्यात येणार्या कृषी योजना व BBF पेरणी तंत्रज्ञान, MREGS फळबाग लागवड, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच 1 जूलै पासून सुरु झालेल्या फसल बिमा सप्ताह निमित्त पिक विमा योजना, फळ पिक विमा योजना याबद्दल माहिती दिली तसेच कृषिक अँप, पिक विमा अँप, दामिनी अँप डाउन लोड करण्याबाबत अवाहन केले, यावेळी षोषण युक्त सुरक्षित अन्न योजना अंतर्गत शेतकऱ्यांना भाजीपाला किट वाटप करण्यात आले, यावेळी श्री. उमेश सांळुखे सरंपच, प्रशांत खलाटे, अशोक खलाटे, सुनिल खलाटे, ग्रामसेवक विजय चव्हाण, कृषि सहाय्यक निंरजन घाडके, गणपत खलाटे, सुधाकर खलाटे, महादेव साबळे आणि इतर शेतकरी बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कृषि सहाय्यक राहुल भोसले यांनी केले.