प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी संजीवनी कार्यक्रम मौजे खामगळवाडी तालुका बारामती येथे दिनांक ३०/०६/२०२२ रोजी संपन्न झाला. कृषी संजीवनी कार्यक्रमांमध्ये सुपर केन नर्सरी, एम आर जी एस फळबाग लागवड, हुमनी प्रकाश सापळा, पिक विमा, फळ पिक विमा, महाडीबीटी, पी एम एफ एम ई व व एकरी शंभर टन ऊस तसेच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, मका पिक शेती शाळा, भाजीपाला मिनी कीट उपस्थित महिलांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा मध्ये मार्गदर्शन कृषी सहाय्यक स्वाती कोकणे यांनी केले. उपविभागीय कृषी अधिकारी श्री तांबे व तालुका कृषी अधिकारी सौ बांदल व मंडळ कृषी अधिकारी वडगाव निंबाळकर श्री मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यात सदरील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमास बहुसंख्याने महिला शेतकरी उपस्थित होत्या.