चोपडा- येथील श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज
चोपडा व प्रदेश तेली महासंघ चोपडा च्या वतीने मा. तहसीलदार यांना कन्हैया हत्येप्रकरणी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. उदयपुर येथे कन्हैया तेली यांची निर्घुण हत्या करण्यात आली. याप्रकरणी तेली समाजात संतापाची लाट उसळलेली आहे. पिडीत कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा म्हणून चोपडा तेली समाजातर्फे 30 जून 2022 रोजी तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दोषी हत्यारांना त्वरित फाशी देण्यात यावी. पीडित कुटुंबीयांना पूर्ण संरक्षण द्यावे. पीडित कुटुंबाला भरीव आर्थिक मदत व्हावी. पीडित कुटुंबाच्या संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी शासनाने घ्यावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदरच्या मागण्या राजस्थान सरकार व केंद्र सरकार यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात याव्यात व पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या. त्वरित न्याय न मिळाल्यास संपूर्ण भारतभर तेली समाज रस्त्यावर उतरेल् व तीव्र आंदोलन करेल असे यावेळी समस्त तेली समाजातर्फे जळगाव जिल्हा प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष के. डी. चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले. विश्वस्त श्री राजेंद्र गणपत चौधरी ,समाजाच्या ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती बेबीताई तुकाराम शिरसागर, सौ योगिता शशिकांत चौधरी, लखनभाई तेली, गोपाल प्रकाश चौधरी, , सुनील पांडुरंग चौधरी ,शशिकांत सुभाष चौधरी, देवकांचे चौधरी आदिनी आंदोलनात भाग घेतला. मा तहसीलदार यांचे वतीने नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारून पुढील कारवाईसाठी पाठवीत असल्याचे नमूद केले., यावेळी कन्हैया कुमार हत्यारांना फाशी द्या, कन्हैया कुमार च्या परिवाराला संरक्षण द्या, कन्हैया कुमारच्या परिवाराला आर्थिक मदत द्या ,कन्हैया कुमार अमर .अशा घोषणा देण्यात आल्या. घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून कन्हैया कुमार यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *