प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी संजीवनी सप्ताह मोहीम मौजे क-हावागज व नेपतवळन तालुका -बारामती येथे काल दि.29/6/2022 रोजी कृषी संजीवनी सप्ताह मोहीम अंतर्गत सुपरकेन नर्सरी,एकरी 100 टन ऊस उत्पादन , MREGS फळबाग लागवड, गो.मुं.शे.अ.विमा व इतर विस्तार योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक संतोष पिसे व कृषी पर्यवेक्षक के.ए.काझडे यांनी मार्गदर्शन केले . मा.उपविभागीय कृषी अधीकारी बारामती वैभव तांबे व तालुका कृषी अधीकारी बारामती सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनखाली बारामती तालुक्यात सदरील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. मंडळ कृषी अधीकारी अरविंद यमगर यांनी सदरील कार्यक्रमाचे नियोजन मौजे क-हावागज व नेपतवळन येथे करण्यात आले.सदरील कार्यक्रमासाठी बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *