बारामती: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त महापुरुषाच्या प्रतिमचे पूजन व इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यां चा सत्कार चे आयोजन नगरसेवक बिरजू मांढरे व मातंग एकता आंदोलन चे जिल्हा अध्यक्ष राजू मांढरे यांनी डॉ आंबेडकर वसाहत येथे केले होते.
या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे,नगरसेवक सुधीर पानसरे,राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या शहर अध्यक्षा आरती शेंडगे,माजी नगरसेवक अभिजीत चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य के टी जाधव आदी मान्यर उपस्तीत होते.
अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरणादायी असून कथा,कादंबऱ्या ,पोवाडा च्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारे अण्णाभाऊ म्हणजे शोषितांचे प्रतीक असल्याचे मनोगत मध्ये सर्व मान्यवरांनी सांगितले.
साई बाबा पालखी सोहळा,व्यसन मुक्ती केंद्र,दहीहंडी,महा पुरुषांच्या जयंती आदी साजरे करताना लॉक डाऊन मध्ये अन्नदान असे उपक्रम राबविले आहे लवकरच डॉ आंबेडकर वसाहत चा भूमिपूजन कार्यक्रम होईल व रहिवाश्यां ना हक्काचा कायमस्वरूपी निवारा मिळणार असल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले.
दिलीप सोनवणे,धनंजय तेलंगे,विजय तेलंगे, किरण बोराडे,तुषार शिंदे,सोमेश सुतार,सचिन मांढरे,अंकुश मांढरे,केदार पाटोळे,विक्रम लांडगे,निलेश जाधव,कृष्णा कांबळे आदींनी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले आभार मोहन इंगळे यांनी मानले