प्रतिनिधी – कृषी संजीवनी सप्ताह मौजे गाडीखेल तालुका बारामती येथे आयोजन करण्यात आला.
त्यावेळी कृषि प्रयवेक्षक श्री घोळवे व आत्मा चे गणेश जाधव यांनी महाडिबीटी यांत्रिकीकरण योजना, ठिबक सिंचन योजना, मग्रारोहयो बांधावर फळबाग लागवड ,विहीर पुनर्भरण , स्मार्ट प्रक्लप, पीएफएमएस या योजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त विस्तार योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भाजीपाला बियाणे मीनि कीट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री घोळवे ए.बी.कृषी पर्यवेक्षक यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक , उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिक कृषी सहाय्यक श्री सोमनाथ वाघचौरे यांनी करून दाखवले.
त्यावेळी शिर्सुफळ गावचे उपसरपंच श्री शरद शेंडे, कृषीमित्र अनिल लोखंडे तसेच अजित आटोळे व शेतकरी उपस्थित होते .
गाडीखेल येथे कृषी संजीवनी सप्ताह संपन्न
