प्रतिनिधी – राज्यभरात 25 जून ते 1 जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम राबविली जाते. त्या अनुषंगाने 27 जून रोजी मौजे-सायंबाचीवाडी या ठिकाणी कृषी संजीवनी मोहिम 2022-23 अंतर्गत महिला कृषी तंत्रज्ञान दिन सुप्रिया बांदल तालुका कृषी अधिकारी, बारामती व बापूराव लोदाडे कृषी पर्यवेक्षक सुपे यांच्या उपस्थितीत पार पडला. पौष्टिक तृणधान्यं व कडधान्य विषयक माहिती देऊन परसबाग बीयाणे मिनीकीट वाटप केले. कृषी विभागाच्या विविध योजनाविषयी कृषी पर्यवेक्षक बापूराव लोदाडे साहेब यांनी माहिती दिली. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत बीज भांडवल, प्रक्रिया उद्योग मध्ये जास्तीत जास्त महिला शेतकरी भगिणीनी सहभागी होण्याचे अहवान सुप्रिया बांदल यांनी केले. कार्यक्रमास लोणकर, सरपंच हनुमंत भगत तसेच ग्रामपंचायत सदस्या गावातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सौ तृप्ती गुंड कृषी सहाय्यक यांनी केले होते.